
आज आठवली माझी आई
Read Count : 52
Category : Poems
Sub Category : N/A
खूप थकून गेलो होतो ,
हात पाय गळून गेले होते .
भाड्याच्या घरात एकटाच भूतासारखा..
फोनमध्येही वेगवेगळे कार्यक्रम लावले होते.
भूक लागली आणि मन व्याकूळ झालं,
खूप विचार करूनही सुचेना काही,
म्हणूनच आज....
आठवली माझी आई.
ती रागवायची पण,
रूसली कधीच नाही .
भूक थोडी असली तरी,
भाकर कधी कमी केली नाही.
खूप पोट भरून खायचं ,
तेव्हा तिच्यावर प्रेम कधी आलं नाही.
तिच्या सोबत वेळ तर नाहीच पण,
प्रेमाने बोलायलाही जमलं नाही.
किती छान असतं आई नावाचं पान,
तिला प्रेम कधी कमी करता आलं नाही.
कसं सांगू.....
म्हणूनच आज आठवली माझी आई.
नौकरी मिळाली ,खूप आनंदी झाली.
आधार मला तिचा असा,
जणू कूंपणाच्या आधारावर,
आली होती वेली.
आता आठवण येते तिची,
मन रडतं धाई-धाई.
म्हणूनच आज आठवली माझी आई .
( कवी :-सिमा निवॄत्ती ससाने )
मुंबई अग्निशमन दल
विक्रोळी अग्निशमन केंद