गुदमरेल श्वास तुझा Read Count : 23

Category : Poems

Sub Category : N/A
गुदमरेल श्वास तुझा

जगात या का असावे तुझे
धोरण फक्त मला संपवण्याचे,
तूच संपण्याआधी सुरू कर
कार्य क्षणभर मला वाचवण्याचे ||

आता खूप झाले तुझे तुझ्याच
स्वार्थापायी मला तोडणे,
गुदमरेल श्वास तुझाच जर
सुरू केले नाहीस तू कणकण माझे जोडणे ||

जर तुम्ही हिरवळच संपविली
का येणार नाही दुष्काळ,
आजच लाव एकतरी रोपटे
जर यावा वाटत असेल पुन्हा सुकाळ ||

किती दिवस पुरेल तुला कृत्रिम 
प्राणवायू केलेला बाहेरून आयात,
संपेल तिथलाही जर जगभर नाही केली
या हिरवळीची अवघ्या विश्वात निर्यात ||

✍️✍️ आदेश बाळू कोळेकर (१८/०४/२०२१)
पुणे

Comments

  • No Comments
Log Out?

Are you sure you want to log out?